*रामहिंगणी शाळेस मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याकडून पुस्तके भेट*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामहिंगणी यांनी " आपले अधिकारी" या उपक्रमांतर्गत दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी आपल्या मोहोळ तालुक्यातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती विभाग कार्यालय व येथील वरिष्ठ अधिकारी यांचे कामकाज याविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी सदर कार्यालयास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामहिंगणी येथील 55 विद्यार्थी,शिक्षक यांनी भेट दिली होती. त्यावेळेस मोहोळ तालुक्याचे तहसीलदार आदरणीय प्रशांत आदरणीय प्रशांत बेडसे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना पुस्तके द्यायचे आश्वासन दिले होते.त्यानिमित्ताने आज त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामहिंगणी शाळेस सुमारे दहा हजार रुपयाची शंभर पुस्तके भेट दिली.यामध्ये अच्युत गोडबोले सरांची अर्थात, किमयागार, जग बदलणारे जेनिफस त्याचबरोबर श्रीमान योगी, मृत्युंजय, श्यामची आई, आपण जिंकू शकता, मुसाफिर, ठरलं डोळस व्हायचं, महानायक, प्रकाशवाटा ,डॉक्टर किरण बेदी ,विविध सामान्य ज्ञानाची पुस्तके समाविष्ट आहेत. माननीय तहसीलदार साहेबांनी शाळेत पुस्तके दिले असल्याने ती ठेवण्याची व्यवस्था म्हणून म्हणून तहसील कार्यालयाचे लिपिक श्री अजित वाघमोडे यांनी कपाट देण्याचे जाहीर केले.मोहोळ तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रधान सोहळ्यास मोहोळ तहसील कार्यालयाचे लिपिक श्री अजित वाघमोडे, लिपिक चंद्रकांत मासाळ नाना, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमोडे, केंद्रप्रमुख बिरमल खांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर काळे, सहशिक्षक पुरुषोत्तम नगरे सोबत ग्रामस्थ अंजनीकुमार वाघमोडे व पांडुरंग वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.पुस्तके भेट दिल्याबद्दल रामहिंगणी शाळेतील सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ, सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती,सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे आभारी आहेत.
#reels #reelsinstagram #reelitfeelit #reelsvideo #post #ramadan #kawaii #fyp #tj #dp